पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महसूली प्रकरणांच्या न्यायनिवाड्यासाठी स्वतंत्र न्याययंत्रणेची गरज

इमेज
  महसूली प्रकरणांच्या न्यायनिवाड्यासाठी स्वतंत्र न्याययंत्रणेची गरज .      वकिलांच्या साठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेला हा माझा लेख! म्हटलं आता आहोत ब्लॉगरवर, तर अपलोड करून टाकावा हा लेख! त्यानिमित्ताने मनातली खदखद व्यक्त करावी.... वरील विषयाचं विस्तृत विचारमंथन करण्यापूर्वी संदर्भ म्हणून मला २ घटना नमूद कराव्याश्या वाटतात. त्यातील पहिली घटना म्हणजे, मी 'लॉ' पासआउट झाल्यावर माझं लगेचच लग्न झालं, आणि माझे पती 'सुजय' यांच्या सोबतच मी वकिलीची प्रॅक्टिस करू लागले. कॉलेज मध्ये असताना “लँड लॉं” हा माझा आवडता विषय असल्याने मला मामलेदार कोर्ट आणि जमीन महसूल संबंधी प्रकरणे कशी चालतात हे पहायचं होतं. तहसीलदारांनी पारित केलेल्या आदेशा विरुद्ध पुनर्विचार अर्ज दाखल करणेसाठी आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेलो. “स्टे” अर्जावरती आमचा युक्तिवाद साहेबांनी ऐकून घेतला, रोजनामा स्वतः लिहून त्यावरती वकील व पक्षाकरांच्या सह्या घेतल्या. “ठीक आहे, स्टे चा आदेश पारित करू” असे सांगितले. संबंधित कारकून हा प्रकरणाची फाइल घेऊन दुसऱ्या केबिन मध