पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोजणी अर्ज कसा करायचा? कोर्टाद्वारे मोजणी करून घेता येते?

इमेज
  मोजणी अर्ज कसा करायचा? कोर्टाद्वारे मोजणी करून घेता येते?      दिवाणी प्रकरणांच्या चौकशीतला सगळ्यात किचकट परंतु मनोरंजक प्रकार म्हणजे मोजणीदारांचा उलट तपास ! अतिक्रमणाच्या दाव्यात आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे हे मोजणीदारांच्या तोंडून वदवून घेणे हे काय एका कलेपेक्षा कमी नाही. असो, जमिनीची मोजणी करणे हे एक शास्त्र आहे. खरं पहाता, पाश्चात्य विद्येचा प्रसार होण्यापूर्वी आपल्या भारतात जमीन मोजणी होतंच होती. बिघा, कोस वगैरे पूर्वीची मापं! त्या वेळेस कशी मोजणी व्हायची माहिती आहे? गावातले पंच त्यांच्या विटीचे माप घेऊन काठी तयार करायचे आणि त्या काठीने सर्व शेतीचे माप घेतले जायचे. नंतरच्या काळात अनेक तऱ्हेच्या साखळ्या मोजणीसाठी वापरल्या गेल्या त्या साखळ्यांचे परिमाण ब्रिटिश मापन पद्धतीवर अवलंबून होतं. उदा. मीटर साखळी, गुंटर साखळी, इंजीनियरची साखळी, रेविन्यू साखळी, पोलादी बंद साखळी, वगैरे आणि या साखळ्यांचा जन्मोजन्मीचा साथीदार म्हणजे ‘चिणी’ हा १२ इंचांचा बांण, जमिनीत खुपसण्यासाठी! आता मात्र या सगळ्या साखळ्या प्रदर्शनातच पाहायला मिळतात. जुन्या लोकांनी अशा अनेक युक्त्या केल्या आणि नव्या लोक

नोटरी वकील म्हणजे काय?

इमेज
                                                         नोटरी वकील म्हणजे काय? २०१८ चा हा किस्सा! २०१८ साली मी एल.एल.बी. ची पदवी पूर्ण केली. पदवी पूर्ण करेपर्यंत मला कधी नोटरी वकिलांच्याकडे जाण्याचा संबंध आला नव्हता. त्यामुळे नोटरी वकील नेमकं करतात काय? हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता होती. बारमध्ये (आम्ही वकील लोक कोर्टात ज्या ठिकाणी बसतो त्या जागेला ‘बार’ असं म्हणतात.) मी सुजयला विचारलं, “हे नोटरी वकील काय करतात रे? आणि नोटरी म्हणजे नेमकं काय? त्यावर गडबडीत असलेल्या सुजय ने उत्तर दिलं, आण कागद, मार शिक्का.. आण कागद, मार शिक्का.. आण कागद, मार शिक्का.. हे नवरे लोक बायकोच्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर देतील तर शप्पथ! असो, हा झाला विनोदाचा भाग! वकिलांच्या साठी जसा अॅडव्होकेट अॅक्ट असतो तसा नोटरी वकिलांसाठी ‘नोटरीज् अॅक्ट’ असतो हा नोटरीज् अॅक्ट एकूण १५ कलामांचा अॅक्ट आहे. आणि त्याविषयीची नियमावली नोटरीज् रूल्स, १९५६    मध्ये समाविष्ट केलेली आहे. या नॉटरीज् रुल्स मध्ये एकूण १७    कलमे आणि  XVI  फॉर्म्स आहेत.. त्याचप्रमाणे नोटरी वकिलांना या नियमावली अंतर्गत कामकाज करावं लागत. तर सगळेच वकील