पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
                      परस्पर संमतीने घटस्फोट कसा घेतात? काही दिवसांपूर्वी एक शिक्षक दाम्पत्य पक्षकार म्हणून आलेलं होतं. त्यांना mutual consent divorce म्हणजेच परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा होता. त्यांच्यासोबत सविस्तर बोलून माहिती घेऊन घटस्फोट घेण्याची कायदेशीर प्रक्रिया मी समजावून सांगितली. त्या अनुषंगाने आम्ही घटस्फोटासाठी कोर्टात पिटिशन दाखल केलं. लग्नाला केवळ २ वर्ष झाली आहेत हे पाहून मे. कोर्टाने त्यांचं प्रकरण मेडियएशन साठी ठेवलं. दाखल तारखेपासून कायद्यानुसार ६ महिन्यांचा कालावधी कोर्ट देतं ज्याला कूलिंग ऑफ पीरियड म्हणतात किंवा 6 months statutory period म्हणतात. काही तडजोड होते का किंवा संसार टिकू शकतो का हे पाहण्यासाठी! २ महिन्यानंतर हे दोघेही परत माझ्याकडे आले. “मॅडम, आम्हाला दोघांना ताबडतोब घटस्फोट पाहिजे. इतके दिवस माझ्याचनी थांबणे अशक्य आहे. मला आता स्थळ येऊ लागली आहेत.” मी म्हणाले, “अहो, पण आपण कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे न? विहित मुदत संपल्यावर कोर्ट तुमच्या अर्जावर आदेश करेलच.” यावर ते शिक्षक म्हणाले, “काहीही सांगता का हो मॅडम? आमच्या ओळखीच्यातल्या एकांनी परस्प